निमखेडी शिवारातून वाळूची वाहतूक करणार्या ट्रॅक्टरवर कारवाई
जळगाव : निमखेडी शिवारातील गिरणा नदीच्या पात्रातून बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणार्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाने कारवाई केली. याप्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
वाळू चोरी पुन्हा ऐरणीवर
शहरापासून जवळ असलेल्या गिरणा नदीच्या पात्रातून बेकायदेशीर वाळूची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी महसूल विभागाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दाखल घेतल जळगाव तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार विशाल सोनवणे व त्यांच्या पथकाने बुधवार, 22 डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास निमखेडी शिवारात गिरणा पात्रात अवैधपणे वाळूचा उपसा करणार्या ट्रॅक्टरवर धडक कारवाई केली. याि ठकाणी (एमएच 19 सीव्ही 3634) क्रमांकाच्या ट्रॅक्टरवर धडक केली कारवाई करत असताना ट्रॅक्टर चालक हा ट्रॅक्टर व टाली घेऊन पळवत होता. त्याचा महसूल पथकाने पाठलाग केला. नंतर चालकाने ट्रॅक्टर व ट्रॉली सोडून पसार झाला. महसूल पथकाने ट्रक्टर जप्त केले. या प्रकरणी नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात दुपारी 11 वाजता अज्ञात ट्रक्टर चालकवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार अनिल फेगडे करीत आहे.




