मोबाईल चोरट्यास जळगाव गुन्हे शाखेने केली अटक


जळगाव : शहरातील शनिपेठ परीसरातून मोबाइल चोरणार्‍या संशयितालास्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून १० हजार रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाफर राजू शेख ( २८, रा.इस्लामपुर, जामनेर= असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून केली अटक
जामनेरात जाफर शेख हा चोरीचा मोबाइल विक्री करण्यासाठी फिरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार सुनील दामोदरे, दीपक पाटील , संदीप साबळे , प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, ईश्वर पाटील, भारत पाटील यांच्या पथकाने गुरुवारी जामनेर शहरातून संशयीत जाफर शेख याच्या मुसक्या आवळल्या. त्याने शनिपेठ परीसरातून मोबाइल चोरी केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीतील मोबाइल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी त्याला शनिपेठ पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !