नाताळ सण साधेपणाने साजरा करा : सरकारने जारी केली नियमावली


मुंबई : दोन दिवसांवर आलेला नाताळ सण साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. या संदर्भात सरकारने नियमावली जाहीर केली आहे. देशात ओमायक्रॉनचे रुग्ण पाच दिवसांत दुप्पट वाढले आहेत. आता कुठलीही प्रवासाची पार्श्वभूमी नसताना ओमायक्रॉनबाधित रुग्ण सापडू लागल्याने देशाची चिंता वाढली आहे. राज्येही वाढू लागली आहेत. 14 राज्यांत एकूण 220हून अधिक जणांना ओमायक्रॉनी बाधा झाली आहे. महाराष्ट्र आणि दिल्ली यात आघाडीवर आहेत. य

नाताळवर ओमायक्रॉनचे सावट
कोरोनाच्या नव्या प्रकाराची माहिती मिळताच महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये आतापासूनच सावधगिरीची पावलं उचलली जात आहेत. याचपार्श्वभूमीवर अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या नाताळावर देखील ओमायक्रॉनचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने सण साजरे करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. तसेच नाताळसाठी नियमाली देखील शासनाने जाहीर केली आहे.

अशी आहे सरकारची नियमावली

ख्रिश्चन बांधवांनी या वर्षी देखील नाताळचा सण खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने करावा

चर्चमध्ये येणार्‍या प्रत्येकासाठी मास्कचा वापर बंधनकारक

फटाक्याची आतिषबाजी करण्यात येऊ नये

चर्चच्या बाहेर परीसरात दुकाने अगर स्टॉल लावू नये

कोणत्याही प्रकारे गर्दीला आकर्षित करणार्‍या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आणि मिरवणूकीचे आयोजन करु नये

कोणत्याही वेळेत चर्चमध्ये गर्दी होणार नाही याची संबंधितांनी काळजी घ्यावी

स्थानिक चर्चमध्ये आयोजित केल्या जाणार्‍या मासमध्ये 50 टक्के लोकांना चर्चमध्ये उपस्थित राहण्यास परवानगी जास्त जणांचा समावेश नसावा.

सुरक्षित शारीरिक अंतर अर्थात फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासोबतच चर्च परिसराचं नियमितपणे निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करणं अनिवार्य


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !