भुसावळात उद्या प्रसिध्द उद्योगपती विश्वनाथ अग्रवाल यांची प्रकट मुलाखत

स्नेहयात्री प्रतिष्ठानच्या ‘बोल अनुभवाचे’ मुक्त संवादात उलगडणार यशाचे रहस्य


भुसावळ : स्नेहयात्री प्रतिष्ठानतर्फे साहित्य, कला, व्यावसायीक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय अशा सर्वच क्षेत्रातील स्वबळावर स्वतःची ओळख निर्माण करणार्‍या अनुभवी आणि यशस्वी व्यक्तींच्या जडण-घडणींचा, संघर्षांचा आणि पुढच्या पिढीला दीपस्तंभ ठरतील अशा अनुभवांचा बोल अनुभवाचे या व्यासपीठावर मुक्त संवाद दर महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या आठवड्यात प्रकट मुलाखतीच्या रुपात सादर होतो. या मालिकेच्या दुसर्‍या पुष्पात शनिवार, 25 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी पाच वाजता उद्योगपती विश्वनाथ अग्रवाल यांची प्रकट मुलाखत सादर होणार आहे. शहरातील न्यु जवाहर डेअरीच्या मागे असलेल्या न्यु एरीया वॉर्डातील सेंट मेरी स्कुल ही मुलाखत घेण्यात येणार आहे.



शहरवासीयांना उपस्थितीचे आवाहन
युवकांना उद्योजकतेची दिशा मिळावी, यशाची प्रेरणा मिळावी या हेतूने हा उपक्रम स्नेहयात्रीच्या माध्यमातून महिन्यातून दोन वेळा राबवला जातो. कार्यक्रमाला सोशल डिस्टन्स राखून व कोरोना नियम पाळून शहरवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन स्नेहयात्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विरेंद्र पाटील यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !