भीषण अपघातात तिघे जागीच ठार ; वाहनांचा झाला चुराडा


सांगली : सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील नेवरी येथे दोन चारचाकी वाहनांचा भीषण अपघात होवून विट्यातील प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर गजानन निकम यांचे सुपुत्र सुदर्शन निकम आणि तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी येथील कपिल झांबरे आणि धनश्री झांबरे हे दाम्पत्य असा तिघांचा मृत्यू झाला.अपघातग्रस्त गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला असून या अपघातात दोघे जखमी झाले आहेत.

पहाटेच्या सुमारास अपघात
गजानन निकम यांचे सुपुत्र सुदर्शन निकम आणि संग्राम संजय गायकवाड हे दोघे शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास खेराडे येथून विट्याकडे येत होते तर तासगाव तालुक्यातील डोंगर सोनी येथील कपिल माणिक झांबरे आणि त्यांच्या पत्नी आपल्या नातेवाईकांसह तासगावहून पुणे येथे निघाले होते. यावेळी कडेगाव तालुक्यातील नेवरी गावात या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. हा अपघात इतका जबर होता, की या अपघातात तिघांचा मृत्यू झाला.







अपघातातील वाहनांचा चक्काचूर
सुदर्शन निकम, तसेच कपिल झांबरे आणि त्यांच्या पत्नी धनश्री झांबरे यांना अपघातात प्राण गमवावे लागले. तर अपघातातील वाहनांचा चक्काचूर झाला आहे. तसेच या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सांगली येथे हलवण्यात आले आहे. या मोठ्या अपघातानंतर परीसरातून हळहळ व्यक्त करण्यात आली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !