हिंमत असेल तर त्या ऑडिओ क्लीप्स वाजवाच ! आमदार चंद्रकांत पाटलांचे खडसेंना आव्हान
मुक्ताईनगर : एकनाथराव खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यामुळे ते बेछूट आरोप करत सुटले आहेत. त्रयस्थ इसमांच्या संवादाशी माझा काहीही संबंध नाही यामुळे खडसेंमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी त्या ऑडिओ क्लीप्स (Audio Clip) नक्की वाजवाव्यात, यात काही आढळून आले तर मी आमदारकीचा राजीनामा देईल. जर काही निघाले नाही तर खडसे राजकारण सोडतील का ?’ असा सवाल आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. शनिवारी सायंकाळी एकनाथराव खडसे यांनी आरोप केल्यानंतर माध्यमांशी बोलतांना आमदारांनी एकनाथराव खडसे (Eknathrav Khadse) आणि त्यांच्या कन्येवर पुन्हा टीकास्त्र सोडले.
अवैध धंद्यांबाबत आपल्यावरील आरोप हास्यास्पद
मुक्ताईनगर तालुक्यात आपल्या कार्यकर्त्यांचे अवैध धंदे आहेत हा खडसे यांनी केलेला आरोप पूर्णपणे हास्यास्पद असून 99% अवैध धंदे यांच्या कार्यकर्त्याचे आहेत, असे आमदार चंद्रकांत पाटील (Mla Chandrakant Patil) म्हणाले. मुक्ताईनगरात महिला असुरक्षित आहेत असे खडसे म्हणत असले तरी याच खडसे यांनी एका पहिली विरोधात अशी टिप्पणी जाहीर कार्यक्रमातून केल्यानंतर मुंबईत यांच्याविरुद्ध 509 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे, हे खडसे विसरले आहेत का ? असा प्रश्न आमदारांनी उपस्थित केला.


माजी मंत्री एकनाथराव खडसे व अॅड.रोहिणी खडसेंपासून आपल्या जीवाला धोका : आमदार चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप
त्या ऑडिओ क्लिप्सशी आपला संबंध नाही
खडसे ज्या ऑडिओ क्लिपबद्दल सांगत आहेत त्या क्लिपशी आपला काडीमात्र संबंध नाही, दोन जणांमध्ये झालेल्या भांडणातील तो संवाद आहे त्यामुळे आपल्यावरील आरोपात कुठलेही तथ्य नाही, असे आमदार यांनी सांगून मग त्यावेळी का आपल्या विरोधात गुन्हा दाखल केला नाही ? असेदेखील ते म्हणाले. खडसे यांच्या एका कार्यकर्त्याने नोकरीसाठी एकाकडे पैसे मागितले मात्र त्याचा संबंध थेट खडसेंशी लावणे योग्य नाही, असे देखील आमदार म्हणाले.
असा नेता महाराष्ट्रात नाही
गेल्या 30 वर्षांपासून खडसे राजकारण करीत आहेत मात्र त्यांचा इतका खोटे बोलणारा नेता (liar politician) संपूर्ण महाराष्ट्रात नाही, असे सांगून आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, खडसे यांनी आतापर्यंत अनेकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्या अडचणी वाढवल्या असल्याचा आरोपही त्यांनी केला. आपले दोन नंबरचे धंदे आहेत हे खडसे यांनी सिद्ध करून दाखवावे, आपण ते सांगतील ती शिक्षा भोगायला तयार असल्याचे ते म्हणाले.
माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे म्हणाले : या तर चोराच्या उलट्या बोंबा
