समतेच्या विचारांचे कृतीशील पाईक व्हा : प्रा.डॉ.जतीन मेढे


भुसावळ : वंदनीय छत्रपती शिवराय, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज या मानवतेच्या पुजार्‍यांनी आम्हा सर्वांना स्वातंत्र्य ,समता व न्यायाचा अधिकार देऊन आपले जीवन समृध्द केले आहे. त्या सर्वांचा आदर ठेऊन आपण त्यांच्या समतेचे, विचारांचे कृतिशील पाईक झाले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा.डॉ.जतीन मेढे यांनी केले. ते शहिद भागतसिंग फाऊडेशन ,भुसावळ आयोजित महापुरुषांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमात बोलत होते.

महापुरुषांचे जीवन व कार्य नव्या पिढीपर्यंत जाणे आवश्यक
या प्रसंगी बोलतांना प्रा.डॉ.मेढे पुढे म्हणालेत की, मानवतेच्या या लढ्यात आपलं आयुष्य खर्ची घातलेल्या या महापुरुषांचे जीवन व कार्य आमच्या नव्या पिढीपर्यंत जाणे आवश्यक आहे. त्यासाठी या महापुरुषांच्या विचार व कार्याचे आपण कृतीशील वारसदार होणे महत्त्वाचे आहे. वाचन चळवळ गतिमान करून विद्यार्थी व स्नेही मित्रांना आपण या समतेच्या महानायकांचे ग्रंथ भेट द्या, असे आवाहन त्यांनी केले.

यांची विचारमंचावर उपस्थिती
प्रसंगी विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.सुनील नेवे, मुख्याध्यापक संघाचे भुसावळ तालुकाध्यक्ष जे.पी.सपकाळे, प्रा.एम.आर.संदानशीव, प्रा.गोसावी, गायकवाड, जन्मभूमी महिला मंडळाच्या अध्यक्षा माया योगेश फालक, विशाखा पाटील, ज्योतीत सोनवणे, पौर्णिमा म्हसाने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रसंगी महापुरुषांच्या विचार व कार्याचे सतत स्मरण होणेसाठी स्मृती प्रेरणेच्या या 2022 दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. माया योगेश फालक व प्रा.एम.आर.संदानशीव यांनीही या प्रसंगी मनोगत व्यक्त केले.

महामानव डॉ.आंबेडकर यांचा भुसावळशी जवळचा संबंध
अध्यक्षीय समारोपात प्रा.डॉ.सुनील नेवे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व संत गाडगेबाबा या महापुरुषांचा भुसावळच्या भूमीशी जवळचा सबंध होता हे सांगून यावल तालुक्यातील भालोद येथील न्यू इंग्लिश स्कुलला डॉ.आंबेडकरांनी 1929 दिलेल्या भेटीचा वृत्तांत सांगून त्यांच्या विचारांचे महत्व सांगितले.

यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
उपक्रमासाठी योगेश फालक,अड.तुषार पाटील, राहुल गालफाडे, मनीष चौधरी, किशोर गायकवाड, जगदीश वाघ, सुदेश खांडवेकर, विनोद आंबेकर, विरेंद्र पाटील, तुषार फालक, पी.आर.चांगाडे, मुकेश परदेशी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुशील रायपूरे , वेदास पाटील, विशाल अत्रे, नरेश सोनवणे, केदारे आदींनी परीश्रम घेतले. प्रास्ताविक शहीद भगतसिंग फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश रायपुरे तर सूुत्रसंचालन देवेंद्र तायडे यांनी तर आभार समाधान जाधव यांनी मानले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !