नगरसेवक राज खरातसह पाच जणांच्या हद्दपारी स्थगितीबाबत अपिल फेटाळले


भुसावळ : पोलिस दप्तरी दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांच्या अनुषंगाने भुसावळातील नगरसेवक राज खरातसह पाच जणांना जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते. हद्दपारीच्या आदेशाला स्थगिती मिळण्याबाबत नाशिक आयुक्तांकडे अपिल दाखल करण्यात आले होते मात्र हे अपिल नुकतेच फेटाळण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

पाच जणांची झाली होती हद्दपारी
गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे भुसावळातील आतीष रवींद्र खरात (25, रा.समता नगर, भुसावळ), राज उर्फ सनी रवींद्र खरात (27, रा.समता नगर भुसावळ), हंसराज रवींद्र खरात (29, रा.समता नगर), राजन उर्फ गोलू रवींद्र खरात, (22, रा.समता नगर, भुसावळ) आणि अमोल उर्फ चिन्ना शाम खिल्लारे, (25, रा.देशमुखवाडी रेल्वे न्यू वॉटर टँक, हनुमान मंदिराजवळ अकोला ह.मु. समता नगर, भुसावळ) या पाच जणांच्या टोळीला जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी ऑगस्ट 2021 मध्ये जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते. या आदेशाविरोधात नाशिक आयुक्तांकडे अपिल दाखल करण्यात आले होते. या अपिलावर सुनावणी झाल्यानंतर हे अपिल फेटाळण्यात येत असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे तहसीलदार योगेश शिंदे यांनी सोमवार, 27 डिसेंबर रोजी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !