भुसावळात वंचित आघाडीतर्फे स्त्री मुक्ती दिनानिमित्त परीषदेत दहा ठराव पारीत


भुसावळ : वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने शनिवार, 25 डिसेंबर रोजी मनुस्मुती दहन दिन हा ‘स्त्री मुक्ती दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. जेतवन बुद्ध विहारात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिला परीषदेत बोलताना वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी या दिवसाचे महत्त्व विषद केले. या निमित्ताने झालेल्या परीषदेत दहा ठराव पारीत करण्यात आले.

हे ठराव झाले पारीत
या निमित्ताने झालेल्या परीषदेत 25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस हा भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणून जाहीर करावा, समान व गुणवत्तापूर्ण शिक्षण मोफत व मातृभाषेतून मिळणे बाबत, लहान मुलांचे लैंगिक शोषण थांबले पाहिजे, वारंवार होणारी डिझेल आणि पेट्रोल दरवाढ रद्द करावी, एक सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्यात याव्यात, एस.टी.महामंडळ बरखास्त करून ते राज्य शासनात विलीन करण्यात यावे, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाबाबत, कारोना काळातील शैक्षणिक धोरणांमुळे शाळेबाहेर ढकललेल्या नाबालिक मुलींना परत शिक्षणाच्या प्रवाहात आणले पाहिजे, बेपत्ता महिलांच्या शोध मोहिमे संदर्भात वेगळी आणि सक्षम पोलिस यंत्रणा निर्माण करावी, आरोग्याचे खाजगीकरण थांबवावे आदी विषयांवर ठराव झाले.

मनुस्मृतीचे प्रतीकात्मक दहन
या कार्यक्रमात मनुस्मृतीचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा महासचिव दिनेश इखारे, वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे, महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव वंदना आराख, जिल्हा महासचिव जरीना तडवी, जिल्हा उपाध्यक्षा मीरा वानखेडे, आशा सोनवणे, जिल्हा संघटक शोभा सोनवणे, सुलभा मुसळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !