पोलिस पथकावर जमावाचा हल्ला होताच गोळीबार … या शहरात घडली घटना


पुणे : येरवड्यातील कोतेवस्तीमध्ये गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला करताच स्वरंक्षणासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याने खळबळ डाली. दरम्यान, जमावाच्या हल्ल्यात एका पोलिस अधिकार्‍यासह अन्य काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी रात्री उशीरा हा प्रकार घडला.

सराईत गुन्हेगाराकडून नागरीकांना त्रास
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, येरवडा येथील सराईत गुन्हेगार शक्ती सिंह हा परीसरातील नागरिकांना त्रास देत होता. नागरीकांनी त्याच्याविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रार मिळताच पोलिस त्याला पकडण्यासाठी गुरुवारी रात्री कोतेवस्ती परीसरात आले मात्र आरोपी शक्ती सिंह याला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या पथकावर जमावाने अचानक हल्ला केला. अचानक हल्ला झाल्याने पोलिस देखील गोंधळून गेले. पोलिसांनी आपल्या संरक्षणासाठी हवेत गोळीबार केला. जमावाच्या हल्ल्यामध्ये एका अधिकार्‍यासह अन्य काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

या कारणास्तव पोलिसांवर हल्ला
पोलीस आपल्याला पकडण्यासाठी येत असल्याची माहिती शक्ती सिंह याला आधीच होती. त्याने आपल्या समाजातील नागरीकांना पोलिसांविरोधात भडकावले. सिंह याचे ऐकून स्थानिक नागरीकांनी पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये काही पोलिस जखमी झाले. परीस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी हवेत गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर जमाव पांगला व पोलिसांनी अखेर आरोपी शक्ती सिंह याला अटक केली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !