भुसावळातील पोलिस निरीक्षक प्रताप इंगळेंची सतर्कता : आत्महत्येसाठी निघालेल्या तरुणाचे वाचवले प्राण
भुसावळ : खाकी वर्दीतील दर्दी असलेल्या शहर पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांनी आत्महत्येसाठी निघालेल्या उच्चशिक्षीत तरुणाचे प्रबोधन करून त्याचे प्राण वाचवले. घरात किरकोळ वाद झाल्याने संतापाच्या भरात तापी नदीकडे आत्महत्येसाठी निघालेल्या उच्चशिक्षित तरुणाचे शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे यांनी मत परीवर्तन केल्याने हा तरुण पुन्हा नव्याने आयुष्याची सुरूवात करण्याचा संकल्प करून प्रसन्न मनाने घरी परतला.
प्रबोधन केल्याने परीवर्तन
यावल रोडवरील एका उच्चभ्रू वस्तीमधील सुशिक्षित तरुणाचे घरात किरकोळ भांडण झाले. या रागातून तो तापी पुलावरुन आत्महत्या करण्यासाठी घरातून निघाला. त्याच्या पाठोपाठ त्याचे शासकीय सेवेतून निवृत्त झालेले वडील घराबाहेर पडले. यावल रोडवर त्याला थांबवून वडिलांनी मनधरणी केली. मात्र, रागाच्या भरात असलेल्या तरुणाने तापी नदीकडे जात आत्महत्या करणाच, अशी धमकी भरली. या दरम्यान शुक्रवार, 31 डिसेंबर मुळे गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास हा प्रकार आला. पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे हे देखील तेथे पोहोचले. तरुणाच्या वडिलांनी त्यांना हतबलतेने हा प्रकार सांगताच इंगळे यांनी पाठलाग करुन तरुणाला थांबवले. तब्बल अर्धा या तरुणाचे प्रबोधन केले. त्याचा राग कमी झाल्यावर इंगळेंनी त्याच्याकडून शिक्षण व परिवाराची स्थिती जाणून घेतली. यानंतर त्याला वडिलांच्या स्वाधीन केले.


