इंजिनिअर मुलाने आधी आईची केली हत्यानंतर तर घेतला गळफास


पुणे : पाच वर्षांपूर्वी वडिलांचे आजारपणामुळे निधन झाले मात्र आजारपणात मोठा पैसा खर्च झाला तर आईलाही अनेक व्याधी जडल्याने त्यावर होणारा खर्च तसेच नोकरी गेल्याने वाढलेली चिंता या सर्व समस्यातून बाहेर पडण्यासाठी आईचा खून करीत उच्चशिक्षीत तरुणाने स्वतःदेखील आत्महत्या केली. आपल्या 76 वर्षाच्या आईला औषधांचा ओव्हर डोस देत त्यांचा चेहरा प्लॅस्टिक पिशवीत घालून त्यांची हत्या करून इंजिनिअर असलेल्या मुलाने गळफास घेतला. पहाटेच्या सुमारास मेसेज करून नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघड झाला. गणेश मनोहर फरताडे आणि त्याची आई निर्मला मनोहर फरताडे अशी मयतांची नावे आहेत.

नोकरी केल्याने नैराश्य
मयत गणेश याची मावस बहिण शोनित सावंत यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश फरताडे व आपली आई निर्मला फरताडे हे दोघे धनकवडीमध्ये रहात होते. गणेश हा इंजिनिअर होता. त्याची नोकरी गेली होती. त्यातून त्याला नैराश्य आले होते. आपल्यामागे आईचे कोण पाहणार, हे लक्षात घेऊन त्याने आईला औषधांचा ओव्हर डोस दिला. ती निपचित पडल्यावर तिच्या चेहर्‍यावर प्लॅस्टिकची पिशवी घालून गळ्यास पांढर्‍या रंगाच्या दोरीने घट्ट बांधून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्याने शनिवारी पहाटे 2 वाजून 10 मिनिटांनी एक मेसेज केला. आपण बेरोजगारी आणि कर्ज बाजारी झाल्याने आत्महत्या करीत आहोत, असा मेसेज त्याने आपल्या नातेवाईकांना पाठविला. त्यानंतर तो घराच्या छतावर गेला आणि गळफास घेतला.

नातेवाईकांनी पोलिीसांना कळवली माहिती
नातेवाईकांनी गणेशचा मेसेज सकाळी पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहकारनगर पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर मावस बहिणीच्या फिर्यादीनंतर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !