भुसावळात भीषण अपघात : दोघे ठार
इंडिगो वाहनाचे खडका चौफुलीवर अचानक टायर फुटून उभ्या असलेल्या टँकरवर धडकले
भुसावळ : छत्तीसगडकडून कल्याणकडे भरधाव वेगाने निघालेल्या इंडिगो वाहनाचे खडका चौफुलीवर अचानक टायर फुटल्याने हे वाहन उभ्या असलेल्या टँकरवर धडकून झालेल्या भीषण अपघातात 62 वर्षीय महिलेसह तिच्या दिड वर्षीय नातीचामृत्यू झाला तर दाम्पत्य या अपघातात गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवार, 2 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडला. अपघातामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, अपघातात इंडिगो वाहन चक्काचूर झाले आहे. रस्त्यावर उभ्या बेकायदेशीरपणे उभ्या असलेल्या वाहनांवर पोलिस प्रशासनाकडून कारवाई होण्याची अपेक्षा वाहनधारकांकडून होत आहे.
भरधाव वाहनाचे अचानक फुटले टायर
समजलेल्या माहितीनुसार, छत्तीसगड येथून इंडिगो (सी.जी.डी.एफ.5047) ही कल्याणकडे निघाली असताना खडका चौफुली आल्यानंतर अचानक वाहनाचे मागील बाजूचे टायर फुटले व इंडिगो उभ्या टँकरवर आदळली. या अपघातात वाहन चालक दीपकसिंग आलुवालिया (33, रायपूर, छत्तीसगढ) , गुंजन आलुवालिया (30) हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले तर दीपकसिंग यांची मुलगी बानी आलुवालिया (वय 1.5), सुरेंदर कौर (62, रायपूर, छत्तीसगढ) यांचा मृत्यू झाला. स्थानिक नगारीकांसह पोलिसांनी तातडीने जखमींना उपचारार्थ हलवले.
पैसे न दिल्याने आई-वडीलांवर मुलाचा प्राणघातक हल्ला : हल्ल्यात आईचा मृत्यू
पोलिस प्रशासनाची वेळीच धाव
अपघाताची माहिती कळताच शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक स्वप्नील नाईक, पोलिस नाईक संदीप राजपूत, एएसआय शब्बीर तडवी, हवालदार राजेंद्र शिंदे, चालक सुनील शिंदे तसेच बाजारपेठचे सहाय्यक निरीक्षक हरीष भोये व सहकाऱ्यांनी धाव घेतली. जखमींना उपचारार्थ दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
कोरोनाची लस देण्याच्या नावाखाली तरुणाची केली नसबंदी


