ट्रक चालकांना लुटणारी टोळी जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात

पहुर पोलिसात दाखल गुन्ह्याचा उलगडा : पाचही संशयीत अडकले जाळ्यात


भुसावळ/पहूर : ट्रक चालकांना मारहाण करून लुटणार्‍या टोळीला जळगाव गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात लुटलेले दोन मोबाईलसह दोन दुचाकी मिळून 61 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींच्या अटकेनंतर पहूर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश आले असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपींना पहूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ट्रक चालकांना मारहाण लुटले
गुरुवार, 30 डिसेंबर रोजी साडेआठ वाजता वाकोद शिवारातील वाघुर नदीपुलाजवळ ट्रक (एम.एच.19 सी.वाय. 6386) ही येत असतांना दोन दुचाकीवरून आलेल्या संशयीतांनी ट्रक चालक, क्लिनर यांना मारहाण करीत त्यांच्याकडील दोन मोबाईल जबरीने हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी पहूर पोलिसात गु.र.नं.494/2021 भादंवि क.392.341 प्रमाणे दि.31/12/2021 रोजी गुन्हा दाखल होता.





ओळख परेडसाठी नाव ठेवले गुप्त
गुन्ह्यातील आरोपींनी आयशर चालकाला लुटल्यानंतर पोलिसांनी बारकाईने तपास केल्यानंतर भाग्यश्री पालीमसं, उमाळा या कंपनीच्या ट्रक या माल खाली करून येत असताना ट्रक चालकाकडे मोठ्या प्रमाणावर रोकड असल्याने त्या दृष्टीने या घटना घडल्याचा अंदाज गृहीत धरून शोध पथकाने तोंडापुर व वाकोद भागातील ट्रक ड्रायव्हर यांची गोपनिय माहिती काढली. काही संशयीत इसमांचे फोटो प्राप्त करुन ते फिर्यादीस दाखविल्यानंतर एकास त्याने ओळखल्यानंतर संशयीतांना गोद्री, ता.जामनेर गावावरून फत्तेपुरकडे जाण्यापूर्वीच फत्तेपूर येथून ताब्यात घेतले. संशयीतांची ओळख परेड बाकी असल्याने त्यांचे फोटो व नाव अद्याप गुन्हे शाखेने जाहीर केलेले नाही.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देवढे, हवालदार लक्ष्मण अरुण पाटील, नाईक किशोर ममराज राठोड, नाईक रणजीत अशोक जाधव, नाईक श्रीकृष्ण खंडेराव देशमुख, कॉन्स्टेबल विनोद सुभाष पाटील, कॉन्स्टेबल ईश्वर पंडीत पाटील, चालक कॉन्स्टेबल मुरलीधर सखाराम बारी आदींनी फत्तेपूर येथून संशयीतांच्या मुसक्या आवळल्या.

भीषण अपघातात चौघे मजूर ठार 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !