नववर्षात साकेगावला होणार आठ क्रिकेट संघात चुरशीचे सामने
भुसावळ : शहरालगत असलेल्या साकेगाव येथे नववर्षात टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार होणार आहे. जिल्हा परीषद शाळेच्या मैदानावर गावातील स्थानिक आठ संघ भिडणार आहे. स्पर्धा मॉर्निंग सी.सी.तर्फे आयोजित करण्यात आली आहे. महामार्गालगत असलेल्या जि.प.शाळेच्या मैदानावर शनिवारी चार तर रविवारी तीन सामने होतील. स्पर्धेसाठी मॉर्निंग सीसीचे सर्व खेळाडू, क्रिकेटप्रेमी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरीकांचे सहकार्य लाभत आहे. खेळाडूंनी श्रमदानातून मैदानाची सफाई व आखणी केली. स्पर्धेतील विजेता, उपविजेता, उत्कृष्ट गोलंदाज ,फलंदाज ,खेळाडू यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात येणार आहे.
असे होणार सामने
एम्पायर मल्हारविरुद्ध जय बजरंग, मातृभूमीविरुद्ध सिंगापुर सीसी, जय महाराष्ट्र विरुद्ध योद्धा, रॉयल भानखेडाविरुद्ध वीर भगतसिंग यांच्यात सामने रंगतील.


