रावेरात स्त्री शक्तीचा खान्देश माळी महासंघातर्फे गौरव
स्वतःच्या कौशल्याने वाटा निर्माण करणारे समाजाचे दीपस्तंभ : कथा कथनकार प्रा.व.पू.होले
रावेर : आयुष्यात समाजासाठी, कुटुंबासाठी त्याग, परोपकार, समर्पण करणार्या व्यक्तींचा समाज कृतज्ञतापूर्वक सन्मान करतो. सन्मानास पात्र ठरणार्या व्यक्ती स्वतः कौशल्याने नव्या वाटा करतात. या वाटा दाखवण्याचे काम करणारे समाजातील दीपस्तंभ असतात, असे मत कथा कथनकार प्रा.व.पू. होले यांनी येथे व्यक्त केले. खान्देश माळी महासंघातर्फे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी येथील सावित्रीबाई फुले चौकात पुरस्कार वितरणाचे आयोजन करण्यात आले असता प्रमुख अतिथी म्हणून प्रा.होले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासंघाच्या कार्य अध्यक्ष शकुंतला महाजन होत्या.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
प्रमुख पाहुणे माळी समाज पंचमंडळ विश्वस्त प्रल्हाद महाजन, अध्यक्ष रमेश महाजन, अंबिका व्यायाम शाळेचे भास्कर महाजन, एल.डी.निकम, बबलू नगरीया, शामकांत पाटील (सावदा), वाय.एम.बोरोले, कांतीलाल महाजन, रामकृष्ण महाजन, श्रीराम महाजन, अॅड.योगेश गजरे, नगरसेविका रंजना गजरे, नगरसेविका संगीता महाजन, पंचायत समिती सदस्य प्रा.प्रतिभा बोरोले, उद्योजका भारती अग्रवाल, माजी उपसभापती रेखा चौधरी उपस्थित होते.
यांचा झाला गौरव
कार्यक्रमात रावेर तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या माजी नगराध्यक्ष डॉ.रंजना अकोले (रावेर), लता मोसे (कर्जाद), अनुसया महाजन (वाघोड), हेमलता चौधरी (खिरोदा) व कविता बगाडे (शिंगाडी) यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक, शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. रंजना अकोले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.
यांचे कार्यक्रम यशस्वीतेसाठी परीश्रम
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अतुल महाजन, योगेश महाजन, दिनेश महाजन, युवा अध्यक्ष प्रकाश महाजन, नितीन महाजन ,निलेश महाजन , अनिल महाजन, एस. के. महाजन ,वैभव महाजन, हितेश महाजन, विजय महाजन, आशा महाजन, सुमित्रा महाजन, कृष्णा महाजन, छाया महाजन, उषा महाजन, प्रमिला महाजन, सुनीता महाजन आदींनी परीश्रम घेतले. परीचय दिलीप वैद्य तर प्रास्ताविक खानदेशी माळी महासंघ तालुकाध्यक्ष पिंटू महाजन यांनी केले. सूत्रसंचालन पल्लवी महाजन तर आभार चैताली महाजन यांनी मानले.


