टाटा मोटर्सच्या या कारला ग्राहकांकडून मोठी पसंती


मुंबई : टाटा कंपनीतर्फे Tata Motors लवकरच सीएनजी CNG इंधनावर चालणारी कार लाँच करीत असून या कारचे बुकींगदेखील सुरू झाले आहे. देशातील दुसरी सर्वात मोठी कार निर्माता कंपनी टाटा मोटर्सने लॉन्च होण्यापूर्वी एक टीझर जारी केला आहे. टाटा टियागो सीएनजी या महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे. भारतातील टाटा मोटर्सच्या निवडक डीलरशिपवर त्याची अनधिकृत बुकिंग आधीच सुरू आहे.

टीझर केला जारी
टाटा मोटर्सने Tata Motors नवीन वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ जारी केला आहे, जो सीएनजी कार CNG Car लाँच करण्याचे संकेत देतो. कंपनीने अद्याप त्याच्या लॉन्चची तारीख अधिकृतपणे उघड केलेली नाही मात्र गेल्या काही दिवसांपासून ह्या कारचे प्री-बुकिंग सुरू झाल्याचे समजते. मार्केटमध्ये सध्या विक्री होणाऱ्या Tata Tiago कारला NCAP ग्लोबल क्रॅश टेस्टमध्ये या कारला ४ स्टार रेटिंग मिळाली आहे. या कारमध्ये इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशन (EBD) आणि अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (ABS), रिअर पार्किंग सेन्सर, ड्युअल फ्रंट एअरबॅग, स्पीड अलर्ट सिस्टिम आणि कॉर्नर स्टेबिलिटी कंट्रोल असे फीचर्स मिळतात. सुरक्षेच्या बाबतीत टाटाची ही छोटी आणि स्वस्त कार जबरदस्त आहे. टियागो सीएनजीमध्येही हे सर्व सेफ्टी फीचर्स मिळतील.

सध्या, Tiago BS6 अनुरूप 1.2-लीटर, तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिनसह येते.

ही मोटर 6000 RPM वर 86 PS ची पॉवर आणि 3300 RPM वर 113 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन मानक म्हणून 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे आणि त्याला पर्यायी 5-स्पीड AMT देखील मिळते.

कारच्या आगामी CNG आवृत्तीला या 1.2-लीटर पेट्रोल मोटरची डी-ट्यून आवृत्ती मिळण्याची अपेक्षा आहे आणि इंजिन केवळ 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडले जाईल.

नवीन Tata Tiago CNG ची स्पर्धा Hyundai Grand i10 Nios CNG, मारुती सुझुकी S-Presso, S-CNG इत्यादीशी होईल.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !