आयटीआय परीक्षा भुसावळ शहरातच घ्यावी : खासदारांना विद्यार्थ्यांचे साकडे


भुसावळ : तालुक्यातील खडका येथील मंगलदीप आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा स्थानिक स्तरावर भुसावळातच घेण्याची मागणी केली असून या मागणीबाबत खासदार उन्मेश पाटील यांना मंगळवार, 4 रोजी निवेदन दिले. मागणीची दखल न घेतल्यास परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

बसेस बंद मग परीक्षास्थळी जायचे कसे?
विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, गेल्या दिड महिन्यांपासून एस.टी.कर्मचार्‍यांचा संप सुरू असल्याने बस फेर्‍या बंद आहेत मात्र असे असताना आयटीआय विद्यार्थ्यांना एस.एस.सिस्टम व गोदावरी फाऊंडेशन हे सेंटर देण्यात आल्याने तेथे जाणे अडचणीचे ठरणार आहे. गतवर्षी मुक्ताईनगर येथील परीक्षा केंद्रावर परीक्षा झाली मात्र यंदा का नाही? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. न्याय न मिळाल्यास परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा आयटीआय विद्यार्थी विशाल व्हिवळे, अजय बारी, मिलिंद पाटील, प्रथमेश बाबर, उदय मिठे, रुपेश साळुंखे, आकाश साळुंखे, प्रशांत भट, मुणाल पाटील, घनश्याम चव्हाण आदींनी निवेदनाद्वारे दिला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !