अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करणार : सीमा झावरे


रावेर : मध्य प्रदेशातून रावेरमार्गे महाराष्ट्रात येणार्‍या बनावट दारूच्या तस्करीवर आमचे लक्ष असून महामार्गाला लागून असलेल्या ढाब्यांवर अवैध पध्दतीने होणार्‍या विक्रीलादेखील आळा घातला जाईल तसेच चिनावल, खिर्डी, पाल, विवरे खुर्द परीसरातदेखील आम्ही स्वत: लक्ष ठेवून असुन अवैध दारूचा साठा करणार्‍यांवर कारवाई केली जाणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक सीमा झावरे यांनी सांगितले.

अधीक्षकांनी घातले लक्ष
अवैध दारूकडे दुर्लक्ष करून माहिती देण्यास टाळाटाळ करणारे दुय्यम निरीक्षक टेंगळेच्या प्रकरणाकडे आता खुद्द उत्पादन शुल्क विभागाच्या धीक्षकांनीच लक्ष घातल्याने अवैध दारू विक्री तसेच तस्करीला आळा बसण्याची शक्यता आहे. महामार्गाला लागून ढाब्यावर रात्रीच्या वेळी अवैध दारू विक्री होत असल्याचे प्रकार समोर आल्यानंतर देखील दुय्यम निरीक्षक टेंगळे यांच्याकडून कर्तव्यात कसूर होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत होते शिवाय अवैध दारू विक्री करणार्‍यांना सहकार्य केले जात असल्याचा आरोपही होत होता. माध्यमांमध्ये बातमी येताच तसेच जनतेत नाराजीचा सूर उमटताच थातुर-मातूर चार ढाब्यांवर कारवाई करण्यात आली होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !