विषारी औषध प्राशन करीत महिलेची आत्महत्या : जिल्ह्यात या शहरात घडली घटना
शिरपूर : तालुक्यातील बोराडी येथील महिलेने विष घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.
शेतातच घेतले विष
बोराडी येथील बायसेबाई काजरा पावरा (55) यांनी शेतातील घरात विष घेतले. यामुळे त्यांना उलट्या होवुन त्रास जाणवु लागला. त्यामुळे हा प्रकार त्यांच्या कुटूंबियांच्या लक्षात आला. यानंतर त्यांना शिरपुर उपजिल्हा रुग्णालय व नंतर हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू ओढवला.


