संतापजनक : रीक्षाचे भाडे न दिल्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; या शहरातील घटना


पुणे : रीक्षा भाड्याचे पैसे नसल्याने त्याचाच फायदा घेऊन रीक्षा चालकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. पुणे शहरातील रेसकोर्स परीसरात ही घटना घडली. रीक्षा चालकाने या मुलीला रेसकोर्स जवळील एका झाडीत नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत रीक्षा चालकासह तिघांना अटक केली आहे. सागर बिभीषण बचुटे (24), विकीकुमार फुलो पासवान (23) आणि अशोक विर बहादुर थापा (23) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

अल्पवयीन मुलीने दिली तक्रार
याप्रकरणी एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने तक्रार दिली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आणि 5 जानेवारी 2019 रोजी हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी फिर्यादी आणि तिची मैत्रीण रीक्षाने प्रवास केला. यावेळी फिर्यादी आणि त्यांचा मैत्रिणीकडे पैसे नसल्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने रेसकोर्स समोरील झाडीमध्ये नेऊन फिर्यादी बरोबर शारीरिक संबंध ठेवले.

पोलिसांनी दाखल केला गुन्हा
डिसेंबर 2021 च्या दुसर्‍या आठवड्यात फिर्यादी या फुरसुंगी परिसरात राहत असताना त्यांच्या ओळखीचे असलेल्या इतर आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मैत्रिणी सोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करून त्यांची छेड काढली. दरम्यान तक्रार आल्यानंतर हडपसर पोलिसांनी या प्रकरणी बलात्कार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !