पोटच्या दोघा मुलींचा आईनेच केला खून : या शहरातील घटना


पुणे : पोटच्या मुलांचा निर्दयीपणे खून आईनेच केल्याची घटना मुळशी तालुक्यातल्या शिरवली येथे घडली. खुनी आईला पोलिसांनी लोणावळा येथून ताब्यात घेतले असून संतापात तिने हा प्रकार केल्याचे सांगण्यात आले. रागाच्या भरात आईने पोटच्या दोन चिमुकल्यांचा रस्सीने गळा आवळल्याने खळबळ उडाली आहे.

आई विरोधात खुनाचा गुन्हा
आरोपीचा पती संजय जगन्नाथ सोलंकी (वय 25 वर्षे, रा. मुळशी ) याने फिर्याद दिली आहे. पौड पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, 5 जानेवारीला दुपारी आरोपी पूना संजय सोलंकी (24 वर्ष) हिने रागाच्या भरात मोठी मुलगी चंदा संजय सोलंकी (3 वर्षे 6 महिने) व मुलगा आनंद संजय सोलंकी (वय 2 वर्षे) यांचा रस्सीने गळा दाबून खून केला. त्यानंतर मुलांचे मृतदेह उंच वाढलेल्या गवत व झाडा झुडपात टाकून निघून गेली.

लोणावळा येथून महिला आरोपीला अटक
या प्रकाराबाबत पौड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पूना हिला लोणावळा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय ढोले यांनी भेट दिली असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ हे करत आहेत.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !