साडेपाच लाखांची लाच भोवली : प्रांताधिकाऱ्यासह सरपंच जाळ्यात जाणून घ्या नेमकी कारवाई


पुणे : साडेपाच लाख रुपयांची लाच घेताना राधानगरी-कागल (Radhanagri-Kagal) उपविभागाचे प्रांताधिकारी (Prantadhikari) आणि फराळी गावाच्या सरपंचास (Sarpanch) अ‍ॅन्टी करप्शन विभागाने अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. दिलेल्या नोटीसप्रमाणे कारवाई न करता नोटिसा परत घेण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप आहे. पुणे अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या कोल्हापूर युनिटने ही कारवाई केली. प्रसेनजीत बबनराव प्रधान Prasenjit Babanrao Pradhan (49, प्रांताधिकारी, राधानगरी-कागल उपविभाग, कोल्हापूर, सध्या रा. फ्लॅट नं. 303, सी विंग, विंसगेट अपार्टमेंट, न्यूज पॅलेस जवळ, कोल्हापूर. मुळ रा. घर नं. 450, मित्रनगर, नवघन कॉलेज रोड, बीड शहर, जि. बीड) आणि संदीप जयवंत डवर Sandeep Jaywant Dwar (41, सरपंच – फराळी ग्रामपंचायत, ता. राधानगरी. रा. मु.पो. लिंगाचीवाडी, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

11 लाखांची मागितली होती लाच
तक्रारदार यांचे क्रशर असून सदर व्यवसाय बंद करण्याबाबत ग्रामपंचायत फराळी व उपविभागीय अधिकारी राधानगरी-कागल यांच्या कार्यालयाकडून नोटीसा देण्यात आल्या होत्या. या नोटीसप्रमाणे कारवाई न करण्यासाठी आणि नोटिसा परत घेण्यासाठी फराळे गावचे सरपंच डवर यांनी स्वतःसाठी 1 लाख रूपये आणि प्रांताधिकारी प्रसेनजीत बबनराव प्रधान (Prantadhikari Prasenjit Babanrao Pradhan) यांच्यासाठी 10 लाख रूपयांची मागणी केली होती. प्रांताधिकारी प्रधान यांनी सरपंच डवर (Sarpanch Sandeep Jaywant Dwar) यांच्या लाच मागणीस दुजोरा देऊन सदरची लाच रक्कम डवर यांचेकडे देण्यास सांगितले होते. दरम्यान, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली. त्याची एसीबीकडून 8 आणि 9 जानेवारी 2022 रोजी पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये प्रधान आणि डवर हे लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान लाच प्रकरणात रविवारी पहिला हप्ता म्हणून 5 लाख 50 हजार रूपये डवर याने घेतले. त्यास रंगेहाथ पकडण्यात आले.
त्यानंतर प्रांताधिकारी प्रधान यांना देखील एसीबीकडून ताब्यात घेण्यात आले.

यांनी केला सापळा यशस्वी
पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे (SP Rajesh Bansode), अपर अधीक्षक सुरज गुरव (Add.SP Suraj Gurav), अपर अधीक्षक सुहास नाडगौडा (Add.SP Suhas Nadgauda)
यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर एसीबीचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत (DYSP Adhinath Budhwant),
पोलिस निरीक्षक नितीन कुंभार (Police Inspector Nitin Kumbhar), कर्मचारी अजय चव्हाण, शरद पोरे,
मयूर देसाई, रूपेश माने, अमर भोसले, विकास माने आणि नवनाथ कदम यांच्या पथकाने केली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !