गौताळा अभयारण्यात गारगोटीचे अवैध उत्खनन : एकाला अटक ; दोघे पसार
चाळीसगाव : गौताळा अभयारण्यात गारगोटी तस्करी करतांना एकाला वनपरीक्षेत्र अधिकार्यांनी रंगेहाथ पकडल्यानंतर त्यास न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.
अवैध उत्खनन करताना कारवाई
चाळीसगाव येथील गौताळा अभयारण्यात रविवार, 9 जानेवारी रोजी तीन इसम हे गारगोटीचे अवैध उत्खनन करत असल्याची गुप्त माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर देसाई यांना मिळाल्यानंतर पथकाने छापा टाकला मात्र जंगलाचा फायदा घेत दोघे पसार झाले मात्र तोहिद युसुफ खान (20, ब्राह्मणी गराडा, ता.कन्नड, जि.औरंगाबाद) याला पकडण्यात यश आले. संशयीताजवळील 12 किलो 900 ग्रॅम वजनाच्या गारगोटीसह अवजारे जप्त करण्यात आली. संशयीत आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.




यांनी केली कारवाई
ही कारवाई सहाय्यक वनसंरक्षक आशा चव्हाण, जळगाव जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, वनपरीक्षेत्राधिकारी ज्ञानेश्वर देसाई, पाटणा वनपाल ललित गवळी, बोढरा वनपाल दीपक जाधव, कन्नड वनपरीक्षेत्रातील वनपाल पारधी यांच्यासोबत वनरक्षक उमेश सोनवणे, अजय महिरे यांच्यासोबतच कन्नड वनपरीक्षेत्रातील वनरक्षक तसेच वाहन चालक उमेश शिंदे व बापू आगोणे आदींनी केली. तसेच रोजंदारीवर काम करणारे मजूर राजाराम चव्हाण, नितीन राठोड, गोरख राठोड, नाना पवार, मेघराज चव्हाण, अनिल शितोळे, गणेश राठोड, शुभम राठोड आदींनी महत्वाची भूमिका बजावली.
