धक्कादायक : अभियंत्याने केली तरुणाची हत्या : …कारण ऐकून थक्क व्हाल !
पुणे : एका इंजिनिअरने तरुणाच्या छातीत चाकूने भोसकून खून केला. ही धक्कादायक घटना बिबवेवाडीतील सुखसागर नगर भागात सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. बांधकाम सुरु असताना त्याचा कचरा शेजारच्या घरावर पडल्याने झालेल्या भांडणातून खुनाची घटना घडली. शरद सीताराम पुरी (35, रा.सुखसागर नगर, बिबवेवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. बिबवेवाडी पोलिसांनी सचिन विठ्ठल कपटकर (46, रा.सुखसागरनगर, बिबवेवाडी) या अटक केली आहे.
कचरा पडल्याचा वाद बेतला जीवावर
पोलिसांच्या माहितीनुसार, पुरी आणि कपटकर हे सुखसागरनगर भाग 2 मध्ये शेजारी शेजारी राहतात. पुरी हे व्यावसायीक असून कपटकर इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहे. सध्या त्याला कोणताही कामधंदा नाही. पुरी यांच्या घराचे बांधकाम सुरू असून त्याचा कचरा कपटकर यांच्या घरावर पडत होता. यावरुन सोमवारी सकाळी त्यांच्यात भांडणे झाली. त्यात रागाच्या भरात कपटकर याने पुरी यांच्या छातीत चाकूने वार केला. वर्मी घाव बसल्याने त्यात पूरी यांचा मृत्यू झाला.

