जात प्रमाणपत्रासाठी 70 हजारांची लाच भोवली : आरोपी एसीबीच्या जाळ्यात
नाशिक : तक्रारदाराचे निवडणूक विषयक जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरण मंजूर करून देण्यासाठी 70 हजारांची लाच मागणी करून ती स्वीकारणार्या आरोपीच्या नाशिक एसीबीने (Nashik ACB) सोमवार, 10 रोजी मुसक्या आवळल्या आहेत. कंत्राटी वाहन चालक गणेश बाबुराव घुगे (27, रा.नाशिक) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
एसीबीने केला सापळा यशस्वी
आगासखिंड, ता.सिन्नर येथील 52 वर्षीय तक्रारदाराचे निवडणूक विषयक जात प्रमाणपत्राचे काम करून देण्यासाठी संशयीत घुगे याने 8 रोजी लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी नाशिक एसीबीकडे (Nashik ACB) तक्रार नोंदवल्यानंतर सापळा (Trap) रचण्यात आला होता. सोमवारी आरोपीने लाच स्वीकारताच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. दरम्यान, या प्रकरणात आणखी काहींची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. आरोपी तरुण कुणाच्या माध्यमातून हे काम करून देणार होता शिवाय या प्रकरणात कोण-कोण सहभागी आहेत हे देखील समोर येणे गरजेचे आहे.

यांनी केला सापळा यशस्वी
नाशिक पोलिस अधीक्षक सुनील कडासने (SP Sunil Kadasane), अपर पोलिस अधीक्षक नारायण न्याहळदे, पोलिस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा पोलिस निरीक्षक मीरा आदमाने, पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ, नाईक प्रवीण महाजन, नितीन कराड, प्रभाकर गवळी, शरद हेंबाडे, अमोल मानकर, चालक हवालदार संतोष गांगुर्डे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.
