कॅब चालकाच्या हत्येचा उलगडा : तिघे जाळ्यात


औरंगाबाद : नागपूरातील कॅब चालकाच्या (Cab Driver) हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. कॅब चालक विशाल वासुदेव रामटेके (32, रा. नागपूर) असे हत्या (Murder) झालेल्या तरुणाचे नाव आहे तर संशयीत आरोपी विशाल राजेंद्र मिश्रा (रा.कादरीनगर, ता.औसा), शिवाजी दत्तू बनसोडे (रा. कबीरनगर, ता. औसा), सुदर्शन जनकनाथ चव्हाण (रा. उजनी, ता. औसा) असे अटकेतील आरोपीचे नावे आहे.

ग्रामीण पोलिसांनी केली हत्येच्या गुन्ह्याची उकल
नागपूरातील कॅब चालकाच्या हत्येचा (Murder) उलगडा करण्यात ग्रामीण पोलिसांना यश मिळाले आहे. लातूर जिल्ह्यातील आरोपींना कॅब हवी असल्यामुळे त्यांनी नागपूर येथे जाऊन बुकिंग करीत जालना जिल्ह्यात (Jalna Jilha) आल्यानंतर कॅब चालकाचा खून केला. या गुन्ह्यात तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निमित गोयल (SP Nimitta Goyal) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वाहन पळवण्यासाठी रचला घाट
अधीक्षक गोयल म्हणाले, विशाल हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो पुण्यात ओला कंपनीत कॅब (Cab) चालवत होता. त्याची कॅब नळदुर्ग पोलिसांनी लुटमारीच्या गुन्ह्यात जप्त केली त्यामुळे त्याने गावाकडील मित्र सुदर्शन, शिवाजी सोबत मिळून पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनासारखे हुबेहूब दुसरे वाहन पळविण्याचा कट रचला. त्यासाठी त्यांनी नागपूर (Nagpur) गाठत रामटेके यांची कॅब जालना (Jalna) येथे जाण्यासाठी बुक केली. तिघांना घेऊन जालना (Jalna) येथे जाताना आरोपींनी लघवीसाठी वाहन थांबविण्याचे चालकाला सांगितले. मग तिघांनी चालक रामटेके यांना मारहाण केली. त्यांनी प्रतिकार केल्यामुळे त्यांच्या डोळ्यात तिखट टाकून नायलॉन दोरीने गळा आवळला. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी गाडीतील लोखंडी पट्टीने पोटात भोसकले. रामटेके (Ramteke) मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर मृतदेह वाहनातून गोलटगाव परीसरातील झुडपात आणून टाकत आरोपी फरार झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !