कोरोनाचा विस्फोट : भुसावळ शहरात एकाच दिवसात 107 तर जळगाव जिल्ह्यात आढळले 221 रुग्ण
जळगाव : जिल्ह्यात कोरोना (Corona) सुसाट पसरत असून प्रशासनाने आता धडक मोहिम राबवून मास्क न लावणार्यांसह नियम पायदळी तुडवणार्यांवर कारवाई करण्याची अपेक्षा आहे. जिल्ह्यात एकाच दिवसात तब्बल 221 रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. नागरीकांकडून कोरोना नियम धाब्यावर बसवले जात असल्याने प्रशासनाने धडक कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दोन हजार 579 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार 579 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 43 हजार 607 नागरीकांना कोरोनाची (Corona) लागण झाली असून त्यातील एक लाख 40 हजार 261 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून मंगळवारी सहा रुग्णांनी कोरोनावर मात केली.
या शहरात आढळले नव्याने बाधीत
जळगाव शहर 43
जळगाव ग्रामीण 04
भुसावळ 107
अमळनेर 00
चोपडा 32
पाचोरा 05
भडगाव 00
धरणगाव 00
यावल 00
एरंडोल 05
जामनेर 00
रावेर 00
पारोळा 02
चाळीसगाव 14
मुक्ताईनगर 01
बोदवड 01
अन्य जिल्हा 07


