मोठा दिलासा : आयकर परतावा भरण्यासाठी 15 मार्चपर्यंत मुदतवाढ


मुंबई : यंदाच्या वर्षी तुम्ही आय.टी.रीटर्न (आयकर परतावा) (Income Tax Returns) सादर केला नसेल तर दंड भरण्याची चिंता नाही कारण इन्कम टॅक्स रीटर्न्स (Income Tax Returns)  भरण्याच्या मुदतीत आता 15 मार्च 2022 पर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य करदात्यांना केंद्रीय आयकर विभागानं मोठा दिलासा दिला आहे.

इन्कम टॅक्स रीटर्न (Income Tax Returns)  भरण्यासाठीची वाढीव मुदत 31 डिसेंबर 2021 पर्यंत होती. यात वाढ केली जाणार नसल्याचं याआधी आयकर विभागाकडून जारी करण्यात आले होते पण कोरोनामुळे इन्कम टॅक्स रीटर्न (Income Tax Returns) भरताना अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या तसेच संकेत स्थळातील काही त्रृटींमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला त्यामुळे इन्कम टॅक्स रीटर्न भरण्यासाठी वाढीव मुदत देण्याची मागणी करण्यात आली होती. याची दखल घेत 31 मार्च 2022 पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.

यापूर्वी मुदतवाढ मिळणार नसल्याचे स्पष्टीकरण
31 डिसेंबरच्या दुपारी 3 वाजेपर्यंत 5.62 कोटी आयकर रीटर्न (Income Tax Returns) दाखल झाले होते. जीएसटी परीषदेच्या बैठकीनंतर अर्थ मंत्री निर्मला सीतारमन यांनी एक पत्रकार परीषद घेतली होती. ‘इन्कम टॅक्स रीटर्न’ (Income Tax Returns) भरण्याचे काम आरामात आणि सतत सुरू आहे. मोठ्या संख्येने आयकर भरला जात आहे. अशातच लोक कशासाठी आयकर रीटर्न (Income Tax Returns) भरण्याची मुदत वाढविण्याची मागणी करत आहेत माहिती नाही. याची शेवटची तारीख आज आहे, सध्यातरी मुदत वाढ करण्याचा कोणताही विचार नाही’, असे महसूल सचिव तरुण बजाज यांनी सांगितलं होते मात्र आता मुदतवाढ मिळाल्याने व्यापार्‍यांसह कर दात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !