यवतमाळ हादरले : बालरोग तज्ञाची गोळ्या घालून हत्या


यवतमाळ : उमरखेड येथील श्री राजाराम प्रभाजी उत्तरवार शासकीय उपजिल्हा रुग्णालयात सध्या कार्यरत असलेले बालरोग तज्ज्ञ डॉ. हनुमंत धर्मकारे यांची अज्ञात दुचाकीस्वाराने गोळी घालून हत्या केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. डॉ. हनुमंत धर्मकारे असे मयताचे नाव आहे.

हत्येने तणावाचे वातावरण
उमरखेड-पुसद रोडवरील गोरखनाथ हॉटेल समोरून रुग्णालयात जात असताना अज्ञात युवकाने डॉ. हनुमंत धर्मकारे यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे उमरखेडच्या शासकीय रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉ. हनुमंत धर्मकारे मागील 7 वर्षांपासून उत्तरवार शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे बालरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. शहरातील उत्तरवार रुग्णालयाच्या नजीकच असलेल्या गोरखनाथ हॉटेल येथे चहा पाण्यासाठी बैठक असते. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या मोटर सायकलवरुन ते त्यांच्या खाजगी दवाखानाकडे जात असताना अज्ञात युवकाने त्यांच्यावर बंदूक रोखून छातीमध्ये गोळ्या झाडल्या. त्यावेळी आजूबाजूच्या नागरीकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो अज्ञात युवक त्याच्या शाईन गाडीने भरधाव वेगाने पसार झाला. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या डॉक्टरला नागरीकांनी उचलून येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

चित्रपटात काम देण्यासाठी अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी

माजी गृह राज्यमंत्री पाटलांची घटनास्थळी भेट

माजी गृह राज्यमंत्री रणजीत पाटील हे मंगळवारी उमरखेडच्या दौऱ्यावर होते. त्यांना या घटनेचे वृत्त कळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्यासोबत आमदार नामदेव ससाने, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. वातावरण शांत ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी, उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल माळवे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !