कोरोनाचा कहर : राज्यात बुधवारी आढळले तब्बल …. हजार रुग्ण
मुंबई : राज्यात गेल्या 24 तासात 28 हजार 41 रुग्ण कोरोनामुक्त (Corona) होऊन घरी परतले असलेतरी नव्याने मात्र 46 हजार 723 रुग्णांची भर पडल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. मंगळवारी 34 हजार 424 रुग्णांची नोंद करण्यात आली मात्र त्या तुलनेत आज जवळपास 12 हजार अधिक रुग्ण वाढल्याने राज्यात कोरोना (Corona) अधिक घट्ट पाय रोवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, 32 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
86 ओमायक्रॉन बाधीतांची नोंद
राज्यात बुधवारी 86 ओमायक्रॉनबाधीत रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत एक हजार 367 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 734 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.

एकाच दिवसात 32 रुग्णांचा मृत्यू
दरम्यान, राज्यात बुधवारी 32 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 66 लाख 49 हजार 111 रुग्णांनी कोरोनावर (Corona) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.52 टक्के आहे. सध्या राज्यात 15 लाख 29 हजार 452 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 6951 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
