कोरोना बाधीतांना पाच हजारांची मदत ; जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य…
मुंबई कोरोना (Corona) तिसर्या लाटेत सातत्याने रुग्ण संख्या वाढत आहे तर कोरोनाने बाधीत (Corona) झालेल्यांना भारत सरकारकडून कोरोना फंड अंतर्गत पाच रुपये दिले जात असल्याचा मेसेज गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल झाला आहे मात्र या मेसेजमध्ये तथ्य नसल्याचे फॅक्ट चेक (Fact Check) केल्यानंतर स्पष्ट झाले आहे.
काय आहे व्हायरल मेसेजचे सत्य
कोरोनाच्या काळात सोशल मीडियावर अनेक प्रकारचे खोटे दावे आणि मेसेज व्हायरल झाले होते. नुकताच सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत होता की, कोरोना फंड (Corona Fund) अंतर्गत भारत सरकारकडून गरजूंना पाच हजार रुपये दिले जात आहेत. तुम्हालाही पाच हजार मिळवायचे असतील तर लवकर फॉर्म भरा.

पीआयबीने वस्तुस्थिती तपासली
भारतीय सरकारी एजन्सी पीआयबीने (PIB) या व्हायरल मेसेजची चौकशी केली असता, हा मेसेज बनावट असल्याचे समोर आले. पीआयबीने (PIB) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. पीआयबीने (PIB) आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, हा संदेश पूर्णपणे खोटा आहे. असे फेक मेसेज (Fake Massege) फॉरवर्ड करू नका. अशा संशयास्पद वेबसाइटवर (Website) तुमची कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका.
पीआयबी तथ्य तपासणी म्हणजे काय?
पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) सोशल मीडियावर व्हायरल फेक मेसेज किंवा पोस्टचा पर्दाफाश आणि खंडन करते. त्यातून सरकारी धोरणे आणि योजनांची चुकीची माहिती समोर येते. तुम्हालाही कोणत्याही व्हायरल मेसेजचे सत्य जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही या मोबाईल क्रमांक 918799711259 किंवा socialmedia@pib.gov.in वर मेल करू शकता.
