पालकमंत्री व आमदारांच्या प्रयत्नांना यश : मुक्ताईनगरसह रावेर तालुक्यातील शेतकर्‍यांना कोट्यवधींचे अनुदान प्राप्त


मुक्ताईनगर : पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले असून मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकर्‍यांना नुकसानीचे अनुदान प्राप्त झाले आहे.

शेती पिकांचे नुकसान भरपाई मिळाल्याने समाधान
21 मे 2021 ते 31 मे 2021 या कालावधीत झालेल्या चक्रीवादळ, गारपीट व अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईपोटी भरपाई मिळण्यासंदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. शासनाकडून सुमारे तीन कोटी 60 लाख 41 हजार 440 रुपये अनुदान गुरुवारी प्राप्त झाले. रावेर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी दोन कोटी 37 लाख 78 हजार 540 रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. यात मुक्ताईनगर मतदारसंघातील नुकसानग्रस्त गावांचा समावेश आहे तसेच बोदवड तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांच्या नुकसानीपोटी 53 हजार 820 रुपये अनुदान प्राप्त झालेले आहे.



विधानसभेत मांडला होता प्रश्न
मध्यंतरी जळगाव जिल्ह्यातील काही शेतकर्‍यांना मार्च 2021 पूर्वीचे नुकसानग्रस्त नुकसान भरपाईची रक्कम प्राप्त झाली परंतु 21 मे 2021 ते 31 मे 2021 च्या कालावधीत मुक्ताईनगर मतदारसंघातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील अनेक गावांना चक्रीवादळ व अवकाळीचा जबरजस्त तडाखा बसला होता. पंचनामे व इतर प्रक्रिया याबाबतीत सुरू होती. गत महिन्यात 22 डिसेंबर 2021 रोजी मुंबई येथील हिवाळी अधिवेशनात आमदार चंद्रकांत पाटील यांनी हा प्रश्न तारांकित करून नुकसान भरपाई देणार की नाही? असा सरळ सवाल विचारल्याने याप्रकरणी अवघ्या 18 दिवसाच्या आत मॅरोथॉन बैठक झाली. मंगळवार, 11 जानेवारी 2022 रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी सुमारे तीन कोटी 60 लाख 41 हजार 440 रुपये अनुदान तर रावेर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी दोन कोटी 37 लाख 78 हजार 540 रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. यात मुक्ताईनगर मतदारसंघातील नुकसानग्रस्त गावांचा समावेश आहे तसेच बोदवड तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांच्या नुकसानीपोटी 53 हजार 820 रुपये अनुदान प्राप्त झाले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !