अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षकांसह सहाय्यक निरीक्षकांनाही करता येणार


मुंबई : अ‍ॅट्रासिटी गुन्ह्याचा  (Atrocity Crime) तपास आता पोलिस निरीक्षकांसह सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांना करता येणार आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने महासंचालकांना एका पत्राच्या माध्यमातून अनुसुचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, 1989 म्हणजेच अ‍ॅट्रॉसिटीच्या (Atrocity Crime) गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक (Police Inspector) आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याकडे सोपविण्याचे निर्देश दिले आहेत.

महासंचालकांना पत्र सादर
महाराष्ट्र शासन, गृहविभागाच्या वतीने पोलीस महासंचालकांना पत्र सादर करण्यात आले आहे, ज्यामध्ये अनुसुचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) (Atrocity Crime)  अधिनियम, 1989 अन्वये गुन्ह्याच्या तपासाचे अधिकार पोलिस निरीक्षक (गट अ) (Police Inspector) आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक (गट-ब) (Asst. Police Inspector) दर्जाच्या अधिकार्‍यांना प्रदान करण्याबाबतचा प्रस्तावास विधी व न्याय विभागाने सहमती दर्शवली आहे. यामुळे अनुसूचित जाती व अनुसुचित जमाती अधिनियम 1989 अन्वये अधिकार्‍यांना प्रदान करण्याबाबत निर्गमित करावायाच्या अधिसुचनेचे प्रारूप शासनास तत्काळ सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामुळे अ‍ॅट्रॉसिटीच्या केसेस (Atrocity Crime)  यापुढे पीआय (PI) आणि एपीआय (API) लेव्हलचे अधिकारी हाताळू शकणार आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !