नात्याला काळीमा : अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरलची धमकी देत वहिनीवर अत्याचार !
पिंपरी : दीर व वहिनीच्या नात्याला नराधमाने काळीमा फासल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी आरोपी दीरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत आरोपी हा पीडीतेचा नात्याने सावत्र दीर असून त्याने महिलेच्या अंघोळ करतानाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मारहाण केली तसेच जबरदस्तीने शारीरीक संबंध (Balatkar) केले. याप्रकरणी महिलेच्या सावत्र दिराच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ही घटना डिसेंबर 2021 मध्ये घडल्याचे सांगण्यात आले.
व्हिडिओ व्हायरलची धमकी देत अत्याचार
25 वर्षीय विवाहित महिलेने शनिवारी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी हा सावत्र दीर आहे. फिर्यादीचे व्हिडिओ व्हायरल करेल, अशी धमकी आरोपीने दिली तसेच फिर्यादीच्या घरी येऊन फिर्यादीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्याशी जबरदस्ती करून शारीरीक संबंध (Balatkar) केले.

फिर्यादीचे अंघोळ करण्याचे व्हिडिओ आहेत ते व्हायरल करण्याची धमकी आरोपीने दिली. ही घटना 16 डिसेंबर 2021 रोजी दुपारी तीनच्या सुमारास व चार ते पाच दिवसांनी घडली. फिर्यादीने लाजे पोटी व समाजात नाव बदनाम होईल या भीतीने तक्रार दिली नाही. त्यानंतर पतीसह पोलिस ठाणे गाठून त्यांनी याप्रकरणी तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी Balatkar गुन्हा दाखल केला.
