सावखेडासीमवर जलसंकट : नागादेवी पाझर तलावाला गळती
300 ग्रामस्थांचे स्थलांतर ; प्रशासकीय यंत्रणेची धाव
यावल- तालुक्यातील सावखेडासीम गावावर असलेल्या नागादेवी पाझर तलावाला गळती लागल्याने खळबळ उडाली आहे. नदीकाठच्या सुमारे 300 वर ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात आले असून ग्रामस्थांनी नातेवाईकांसह मंदिराचा आसरा घेतला. दरम्यान, प्रशासनाला याची माहिती कळताच त्यांनी तातडीने तलावाला लागलेली गळती थांबवण्यासाठी युद्ध स्तरावर प्रयत्न सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वर्षभरापूर्वी एक कोटीतून तलावाची दुरुस्ती
2006 मध्ये नागादेवी पाझर तलावाला गळती लागल्यानंतर त्याची दुरुस्ती करण्यासाठी उपोषण छेडण्यात आले होते तर त्याची दखल घेत गतवर्षीच या तलावाची सुमारे एक कोटी रुपये खर्चून डागडूजी करण्यात आली मात्र निकृष्ट कामामुळे व संततधार पावसामुळे या तलावाला गळती लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे. नदी काठावरील ग्रामस्थांचे तातडीने स्थलांतर करण्यात आले. दरम्यान, प्रशासनाला याची माहिती कळताच प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, यावल तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी भेट दिली.
धरणाला लागलेली गळती पाहण्यासाठी या लिंकवर क्लीक करा- https://youtu.be/UqmbxIj88Nw