कौटुंबिक वादातून पेटवून घेतल्याने दाम्पत्याचा मृत्यू


भंडारा : कौटुंबिक वादातून दाम्पत्याने पेटवून घेतल्याने दोघांचा मृत्यू झाला तर तीन वर्षीय मुलगा या घटनेत बचावला. महेंद्र सिंगाडे (38) (Mahendra Singade) व मेघा सिंगाडे (30) (Megha Mahendra Singade) अशी मयतांची नावे आहेत. ही घटना कारधा (Kardha) येथे मध्यरात्री घडली. शनिवारी मध्यरात्री दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाल्यानंतर दाम्पत्याने टोकाचा निर्णय घेतला. तुही नको नि मीही नाही, असं म्हणून महेंद्रने आधी स्वतःवर रॉकेल ओतले. नंतर पत्नी मेघावर रॉकेल ओतले आणि पेटवून घेतले.

चिमुकल्यावर रुग्णालयात उपचार
घरगुती भांडणाच्या कारणातून महेंद्रने (Mahendra Singade) पत्नी मेघासह आपल्या 3 वर्षीय मुलाला जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर 3 वर्षीय चिमुकल्यावरती भंडारा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती कारधा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनाकरीता रवाना केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !