नागरीकांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या ‘फटे स्कॅम’ मधील विशाल फटे पोलिसात हजर


सोलापूर : सोलापूरच्या बार्शी येथील ‘फटे स्कॅम’ प्रकरणी संशयित आरोपी विशाल फटे पोलिसांत हजर झाला असून पोलिसांनी त्याला अटक करत शासकीय रुग्णालयात त्याची आरोग्य तपासणी केली. उद्या मंगळवारी त्याला बार्शी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

कोट्यवधींचा चुना लावला
आरोपी विशाल फटे याने बार्शी आणि सोलापुरातील अनेक नागरीकांना कोट्यवधींचा चुना लावला असून तो मागील काही दिवसांपासून फरार होता. फटेने बार्शीतील बड्या नेत्यांसह काही प्रतिष्ठीत मंडळींची फसवणूक केली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार 75 हून अधिकजणांची विशालने 18 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

व्हिडीओ केला होता शेअर
विशाल फटे याने पोलिसांत हजर होण्यापूर्वी सोमवारी सकाळी एक व्हिडीओ शेअर करत संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले ‘मला लोकांचे पैसे बुडवायचे नाहीत. मी जेलमध्ये जरी गेलो तरी जेलमधून बाहेर आल्यावर मी लोकांचे पैसे देईन. मी भीक मागेन पण लोकांचे पैसे देईन. एकाचाही एक नया पैसा देखील माझ्याकडून बुडणार नाही याची खात्री देतो. मी जाणूनबुझून केलेलं नाही. माझ्यावर जी कायदेशीर कारवाई होईल त्यासाठी मी तयार आहे. या गोष्टीमुळं मी इतका प्रेशर खाली आलोय की मी माझी बायको आणि लेकरासह आत्महत्या करायला चाललो होतो. एवढी इज्जत गेलीय. मला मरणं सोपं वाटत होतं. दीड वर्षाच्या मुलीसह मरायची तयारी होती माझी. या सगळ्या गोष्टीला मी एकटाच जबाबदार आहे. लोकांना माझ्यावर विश्वास असेल त्यांनी वाट पाहा, ज्यांना विश्वास नसेल त्यांनी केसेस करा. मला पळून जायचं नव्हतं आणि जाणार नाही.’




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !