रावेर तालुक्यात जलयुक्त कामांमध्ये भ्रष्टाचार : आमदार शिरीष चौधरी मांडणार ‘लक्षवेधी’

13 कोटींच्या कामांबाबत आमदार शिरीष चौधरी लक्षवेधी मांडून चौकशीची मागणी करणार


रावेर : रावेर तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांमध्ये भ्रष्ट्राचार झाल्याची ओरड झाल्यानंतर खळबळ उडाली असून या कामांबाबत आगामी अधिवेशनात अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न मांडून संपूर्ण कामांची चौकशीची मागणी करणार असल्याची माहिती आमदार शिरीष चौधरी (mla shirish chudhari) यांनी दिली. रावेर तालुक्यात (rawer taluka) सुमारे 13 कोटी रुपयांची कामे झाले असल्याचे सांगितले जात असलेतरी तरी प्रत्यक्षात कागदोपत्री कामे झाल्याची ओरड आहे. या सर्व कामांची एसआयटीमार्फत (sit) चौकशी करण्याची मागणी सुज्ञ जनतेतून होत आहे.

आमदारांनी घातले लक्ष
रावेर तालुक्यातील जलयुक्त शिवार (jalyukta shivar) योजनेच्या कामांच्या प्रकरणाची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. या कामांमध्ये भ्रष्ट्राचार झाल्याची ओरड असून संपूर्ण कामांची एका समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे. या कामांबाबत तक्रारी आल्यानंतर रावेर मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी  (mla shirish chudhari) यांनीच लक्ष घातले आहे. जलयुक्त शिवार (jalyukta shivar yojana) योजनेचा रावेर तालुक्याला फारसा लाभ झाला नाही मात्र या योजनेवर काम करणार्‍या अधिकार्‍यांच्या मालमत्तेत पातळी मात्र वाढल्याचा आरोप जनसामान्यांकडून होताना दिसून येतो त्यामुळे योजनेची सखोल चौकशी झाल्यास सत्य जनतेसमोर येणार आहे.

417 कामांवर 13 कोटींचा खर्च
या योजनेंतर्गत 19 गावात 2015 ते 2018 या कालावधीत एकूण 417 कामे करण्यात आली आहेत. या कामांवर 13 कोटी 44 लाख 25 हजार 77 रुपये खर्च झाले आहेत. याच काळात 2015-16 मध्ये 104 टक्के, 2016-17 मध्ये 105 टक्के, 2017-18 मध्ये 97 टक्के, तर 2018-19 मध्ये 71 टक्के पाऊस झालेला आहे. 2018-19 वर्ष वगळता तालुक्यात सरासरी पेक्षा अधिक पाऊस (rain) झालेला आहे. असे असतानाही कामे झालेल्या गावांच्या भूगर्भातील पाणी पातळीत मात्र वाढ झालेली नसल्याचे स्थानिक नागरिकांकडून समजते. पाणी पातळीत वाढ झाली किंवा नाही याबाबत शासकीय माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी मात्र खर्च झालेला कोट्यवधी निधी नेमका मुरला कुठे ? याची वरीष्ठ पातळीवरून चौकशी करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.

यासाठी होते जलयुक्त शिवार
पावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडविणे व जिरवणे, भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे, संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध करण्याची शाश्वता निर्माण करणे, पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे करणे, अस्तित्वात असलेले व निकामी झालेले बंधारे, गाव तलाव, पाझर तलाव, सिमेंट बंधारे आदी जलस्त्रोतांची साठवण क्षमता वाढविणे तसेच नवीन बंधारे, पाझर तलाव, मातीचे बांध तयार करणे,जलस्त्रोतातील गाळ लोकसहभागातून काढून पाणीसाठा वाढविणे, वृक्ष लागवडीस प्राधान्य देणे आदींसाठी जलयुक्त शिवार योजना राबवण्यात आली मात्र तालुक्यात योजनेच्या उद्देशालाच हरताळ फासण्यात आल्याचा आरोप आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !