आयजींच्या पथकाची कारवाई : गावठी कट्ट्यासह संशयीत जाळ्यात
चोपडा : नाशिक आयजींच्या विशेष पथकाने श्रावनसिंह छोटू राजपूत (21, रा.भुरजगड, ता.जि.जैसलमेर, पलसवड, राजस्थान) यास अटक केली. संशयीताच्या ताब्यातून 25 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई बशीर तडवी, रामचंद्र बोरसे, मनोज दुसाणे, राकेश पाटील तसेच चोपडा ग्रामीणचे रीतेश चौधरी आदींनी केली.




