रावेरजवजळ रीक्षा उलटली : एक महिला गंभीर अन्य दोन महिला जखमी
रावेर : रावेर शहरानजीक रीक्षा उलटल्याने तीन महिला जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाल्याने त्यांना जळगावला येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. रावेर शहरातील मराठा मंगल कार्यालयानजीक अॅपेला कट मारताना दुसरी अॅपे रीक्षा उलटली. या अपघातात. अहिरवाडी येथील तीन महिला जखमी झाल्या. यातील दोन महिला किरकोळ जखमी झाल्या असून एक महिलेला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारार्थ जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले आहे.


