आधी पडली प्रेमात नंतर दाखल केली अत्याचाराची तक्रार


नवी दिल्ली : एका डॉक्टरच्या पत्नीचा कुरिअर बॉयवर जीव जडला. त्यानंतर दोघांनी दोन वर्षे लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. पण लग्नाचा विषय निघताच नकार दिल्याने पीडीतेने तरुणाविरोधात अत्याचाराची तक्रार दिली आहे. टीटी नगर पोलिसांनी जबलपुरमध्ये राहणार्‍या कुरिअर बॉयने डॉक्टरच्या पत्नीवर बलात्कार केल्याची माहिती दिली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

आधी रीलेशनशीप नंतर लग्नाला नकार
महिलेने दिलेल्या माहितीनुसार, एक पार्सल पोहोचवण्यादरम्यान कुरिअर बॉयसोबत तिची चांगली मैत्री झाली. आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून दोन वर्षांपर्यंत लिव्ह इन रीलेशनशीपमध्ये ठेवलं. नंतर मात्र लग्नाचा विषय येताच नकार दिला. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. एसआय आकांक्षा शर्मा यांनी सांगितलं की, या भागात राहणारी 36 वर्षी महिला खासगी ठिकाणी काम करते. तिच्या डॉक्टर पतीचा 2016 मध्ये मृत्यू झाला आहे. तिला 13 वर्षांची मुलगीही आहे.

लॉजवर नेत केला अत्याचार
महिलेने पोलिसांना सांगितलं की, ब्लू डॉट कंपनीकडून ती कुरिअर मागवीत होती. याच दरम्यान जबलपूरमध्ये कुरिअर कंपनीत नोकरी करणारा दीपक सिंह ठाकूर याच्यासोबत तिची मैत्री झाली. मैत्री वाढल्यानंतर काही दिवसांनी दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं. दीपक तिला भेटायला जबलपूरहून भोपाळला येत होता. 1 जानेवारी 2017 मध्ये दीपकने तिला भेटायला न्यू मार्केट येथील कंचन लॉज येथे बोलावलं.

टीटी नगर पोलिसात आरोपीविरोधात गुन्हा
दीपकने तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने महिलेला लग्नाचं वचन दिलं. दीपक जबलपूरमधून भोपाळला महिलेसोबत लिव्ह इनमध्ये राहू लागला. दोन वर्षांपर्यंत सोबत राहिल्यानंतर जेव्हा महिलेने दीपकवर लग्नासाठी दबाव आणला तर तो मागे हटला. यानंतर महिलेने टीटी नगर पोलिसात याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही अशी माहिती दिली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !