जळगावात दुचाकी चोरटे सैराट : पुन्हा दुचाकी लांबविली
जळगाव : शहरातील गणेश कॉलनी परीसरातून एकाची 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
घरासमोरून लांबवली दुचाकी
जिल्हा पेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण हरी पाटील (49, रा. गणेश कॉलनी, जळगाव) हे कुटुंबियासह वास्तव्याला आहे. गुरुवार, 20 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास त्यांनी त्यांच्या घरासमोर 30 हजार रुपये किंमतीची (एम.एच. 19 सी.सी.0487) क्रमांकाची दुचाकी पार्किंगला लावली होती. अज्ञात चोरट्यांनी पार्किंगला लावलेली दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. प्रवीण पाटील यांनी दुचाकीचा परीसरात शोधाशोध केल्यानंतर कुठेही मिळून आली नाही. रविवार, 23 जानेवारी रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्याने विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक प्रदीप पाटील करीत आहे.


