भुसावळात स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त लाभार्थींना कार्ड वाटप


भुसावळ : भुसावळ शहर शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे यांच्यातर्फे शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ नागरीक, बालक, महिला शहरातील गरजू आरोग्य, ई-श्रम लाभार्थींना कार्ड वाटप करण्यात आले. त्याआधी स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी शहरप्रमुख शिवसेना बबलू बर्‍हाटे, माजी नगरसेवक दीपक धांडे, निर्मल दायमा, युवा सेना जिल्हा युवा अधिकारी चंद्रकांत शर्मा, तालुका युवा अधिकारी हेमंत बर्‍हाटे, शहर युवा अधिकारी सुरज पाटील, उपशहरप्रमुख पवन नाले, शहर उपसंघटक नबी पटेल, शरद जैसवाल, राजू भाऊ इंगळे, अमोल पाटील उपस्थित होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे, पर्यावरण मंत्री व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार सर्वच शिवसैनिकांनी शिवसेनेच्या माध्यमातून गोर-गरीब महिला, पुरुष, जेष्ठ नागरीक व कामगारांना हक्क मिळवून दिला आहे. समाजातील कोणताही वर्ग शासकीय लाभापसून वंचित राहू नये याची काळजी घेतली आहे, असे शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे याप्रसंगी म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !