फैजपूर महाविद्यालयातील अजय चौधरीची राजपथ, दिल्लीतील पथसंचलनासाठी निवड
फैजपूर : तापी परीसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट व वाणिज्य विभागाच्या प्रथम वर्ष बी.कॉमचा विद्यार्थी अजय दौलत चौधरी याची 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवसाच्या औचित्याने आयोजित दिल्ली येथे राजपथावर पथसंचलनासाठी महाराष्ट्र डायरेक्टरेटच्या वतीने निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून देशातील युवा पिढीला एकता आणि शिस्त या माध्यमातून भारतीय सशस्त्र सेनेच्या पूर्वतयारीचे प्रशिक्षण दिले जाते. सद्यस्थितीत राष्ट्रीय छात्र सेना जगातील सर्वात मोठी युनिफॉर्म यूथ ऑर्गनायझेशन असून आर.डी.सी.कॅम्प, दिल्लीसाठी निवड होणे सर्वच कॅडेट्सचे स्वप्न असते. रणगाव, ता.रावेर येथील दौलत अभिमन चौधरी व प्रमिला दौलत चौधरी या अत्यंत स्वाभिमानी, प्रामाणिक, मेहनती आणि अत्यंत संस्कारक्षम पालकाच्या पोटी जन्मलेल्या अजय याने अत्यंत प्रतिकूल परीस्थितीतून शिक्षण घेऊन धनाजी नाना महाविद्यालयात एनसीसीत प्रवेश मिळवला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी व एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ.राजेंद्र राजपूत यांच्या मार्गदर्शनानुसार अत्यंत कठीण मेहनत व कठोर परीश्रम घेऊन अजय दौलत चौधरी याने देशपातळीवर महाराष्ट्र राज्याचे नाव उज्वल केले आहे. या शिरोपेचात अजय दौलत चौधरी यांनी मानाचा तुरा रोवला असल्याची भावना लेफ्टनंट डॉ.राजेंद्र राजपूत यांनी यावेळी व्यक्त केली. अजय चौधरी याने दिल्लीच्या राजपथ येथे पथसंचलनात स्वतःच्या मेहनतीने व परीश्रमाने स्थान मिळवून आमचा गौरव केला आहे व हा आनंद आयुष्यभर संस्मरणीय असेल, अशी भावना अजयचे वडील दौलत चौधरी यांनी यावेळी व्यक्त केली.
निवडीनंतर शुभेच्छांचा वर्षाव
तापी परीसर विद्या मंडळाचे अध्यक्ष व आमदार शिरीष मधुकरराव चौधरी, उपाध्यक्ष प्रा.डॉ.सुधाकर काशीनाथ चौधरी, उपाध्यक्ष मिलिंद बापू वाघुळदे, चेअरमन लिलाधर विश्वनाथ चौधरी, व्हाइस चेअरमन प्रा.किशोर रामदास चौधरी, सचिव प्रा.मुरलीधर तोताराम फिरके, सहसचिव अनिल नंदकुमार भंगाळे, सर्व व्यवस्थापन व नियामक मंडळ पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, उपप्राचार्य डॉ.उदय जगताप, उपप्राचार्य डॉ.अनिल भंगाळे, उपप्रचार्य प्रा.अनिल सरोदे, उपप्राचार्य प्रा.दिलीप तायडे, समादेशक अधिकारी 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव कर्नल प्रवीण धीमन, प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल पवन कुमार, सुभेदार मेजर कोमलसिंग, सुभेदार जयपाल सिंग, सुभेदार जय बहादुर यांच्यासोबत महाविद्यालयाचे सर्व सन्माननीय प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, कॅडेटस व विद्यार्थी यांनी कौतुक केले आहे.


