कोळवदमध्ये निशुल्क नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद


यावल : यावल तालुक्यातील कोळवद येथे डॉ. कुंदनदादा फेगडे मित्र परिवार आयोजित निशुल्क नेत्र तपासणी शास्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची निशुल्क नेत्र तपासणी करण्यात आली तसेच डोळ्यात मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांना मोतीबिंदू शास्त्रक्रियेची तारीख देऊन रुग्णाची अनुभवी तज्ञामार्फत शास्त्रक्रिया करण्यात आली. डॉ.कुंदनदादा फेगडे मित्र परीवार व कांताई नेत्रालय, जळगाव यांच्या वतीने रुग्णांची जाण्या-येण्याची, राहण्याची व जेवणाची मोफत सुविधा करण्यात आली. या शिबिरात एकूण 176 नेत्र रुग्णांची तपासणी व 20 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी कांताई नेत्रालयात पाठविण्यात आले.

शिबिर यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
शिबिरात कांताई नेत्रालय, जळगाव येथील शिबिर नियोजक युवराज देसाई यांनी मार्गदर्शन केलेव नेत्र चिकित्सक जॅकी शेख यांनी रुग्ण बांधवांची तपासणी केली. यावेळी हर्षल पाटील व डॉ.कुंदन फेगडे यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले. उद्घाटन भाजपा जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील यांनी भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार वाहून केले. युवा सामाजिक कार्यकर्ते डॉ.कुंदन फेगडे, कोळवद सरपंच याकूब तडवी, कोळवद उपसरपंच शशीकांत चौधरी, सातोद उपसरपंच ललित पाटील, माजी सरपंच पांडुरंग पाटील, अनिल पाटील, प्रल्हाद चौधरी, युवराज देसालडे, मीनाक्षी भिरूड, भगवान पाटील, पद्माकर महाजन, आशिष मोरे, सचिन फेगडे, भगवान बर्डे आदींची उपस्थिती होती. शिबिरासाठी हेमंत पाटील, परेश फेगडे, सागर लोहार, तुषार चौधरी, मनोज बारी, विशाल बारी, हर्षल सोनवणे, तीर्थराज भिरूड, अक्षय पाटील आदींनी परीश्रम घेतले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !