‘मतदार राजा जागा हो…आणि लोकशाहीचा धागा हो…’

भुसावळ शहरासह मुक्ताईनगरात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन


भुसावळ : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भुसावळ शहरासह मुक्ताईनगरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भुसावळ तालुक्यातील मतदारांमध्ये जनजागृती व्हावी, नवमतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, मतदानाचा हक्क प्रत्येक नागरीकांचा अधिकार असून तो त्यांनी बजावला पाहिजे यासाठी भुसावळ तहसील कार्यालयातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करीत जनजागृती करण्यात आली. म्युनिसीपल हायस्कूलच्या पूजा मतलाने, गायत्री मतलाने, नेहा कांडेलकर , डिम्पल अडांगळे , पल्लवी लोहार, संध्या डावरे या विद्यार्थिनींनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पथनाट्य सादर केले.

लोकशाही रक्षणासाठी मतदानाचे आवाहन
पथनाट्यातून मुलींनी नव मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, त्याचप्रमाणे सर्वसमावेशक सुलभ व सहभाग पूर्ण निवडणुका निपक्षपाती पार पडल्या पाहिजे हेच लोकशाहीचे खरे गमक आहे हे पथनाट्यातून पटवून दिले. प्रत्येक नागरीकाने निवडणूक प्रक्रियेत मतदान करून भारतीय लोकशाहीचे रक्षण केले पाहिजे, असे आवाहन करण्यात आले. या विद्यार्थिनींना मुख्याध्यापक ललित फिरके, डॉ.प्रदीप साखरे, संध्या धांडे, रेखा सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात घेण्यात आला. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाणे होते. तहसीलदार दीपक धीवरे, नायब तहसीलदार अंगद असेटकर, प्राचार्य व्ही.व्ही. राजूरकर उपस्थित होते. प्रसंगी सर्व विजयी विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते. आभार नायब तहसीलदार अंगद असेटकर यांनी मानले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !