लोकशाही बळकट करण्याच्या कामात बीएलओंसह कर्मचार्‍यांचा सहभाग

प्रांताधिकारी कैलास कडलग ः रावेर राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रम


रावेर : बीएलओंसह मतदार नोंदणी प्रक्रियेत सहभाग असलेल्या कर्मचार्‍यांनी चांगले काम केले असून लोकशाही बळकट करण्याचे काम त्यांनी केले आहे. नव मतदारांची नोंदणी करून त्यांना मतदानाचा बहुमान मिळवुन देण्याचे या कर्मचार्‍यांनी केले प्रतिपादन प्रांतधिकारी कैलास कडलग यांनी येथे केले. रावेर तहसील कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त रांगोळी स्पर्धेसह विविध उपक्रम राबविण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी कैलास कडलग होते. प्रमुख म्हणून तहसीलदार उषाराणी देवगुणे, पोलिस निरीक्षक कैलास नागरे, नायब तहसीलदार संजय तायडे, प्राचार्य बी.व्ही.सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

उत्कृष्ट कार्य करणार्‍यांचा सन्मान
निवडणुकीत उत्कृष्ट कार्य करणारे मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, बी.एल.ओ., शिक्षक यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.तालुक्यातील विविध शाळांमध्ये मतदार जागृतीवर आधारीत रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. उत्कृष्ट नोडल अधिकारी म्हणून प्रा.चतुर गाढे (नाईक कॉलेज, रावेर), हेमंत बाविस्कर (पटेल महाविद्यालय, ऐनपूर), तलाठी दादाराव कांबळे, शरद पाटील, अनंता खवले, खानापूर मंडळ अधिकारी विठोबा पाटील, कोतवाल विकास माळी, इमरान तडवी, माधुरी महाजन, रवींद्र श्रीराम, महेश चौधरी, विनोद अटकाळे, बीएलओ रामराव मुरकुटे, दीपक सोनार, अमिनोद्दीन जैनोद्दीन, नारायण पाटील, शांताराम नरेकर, राजेंद्र इंगळे, मुरलीधर नेमाडे, गोकुळ चौधरी, प्रमोद पाटील, मोहन कुयटे, अशोक महाजन, इशाक अली अशफाक अली, महेंद्र पाटील, फारुकी सदरुद्दीन, दिलीप कोलते, दीपक पाटील, अक्रम खान, कपिल गावीत, गोविंदा महाजन, अशोक कोळी, उमाकांत चौधरी, विश्वास बामनोदकर, अनुप पाटील, पवनकुमार महाजन, गोपाळ सपकाळे यांचा गौरव करण्यात आला.

विविध स्पर्धेत यश प्राप्त करणार्‍यांचाही सन्मान
जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेत प्रज्ञा चौधरी तर चित्रकलेत सोहम सोना तसेच निबंध स्पर्धेत साक्षी धांडे व काव्य स्पर्धेत यश मिळवणार्‍या यश पाटील यांचादेखील सत्कार करण्यात आला. मतदार जागृती अभियानात व्ही.एस.नाईक कॉलेज, रावेर, सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालय, ऐनपूर, श्री स्वामी समर्थ महिला महाविद्यालय, रावेर, अध्यापक विद्यालय, खिरोदा या शाळांचा सहभाग उत्कृष्ट होता. सूत्रसंचलन प्रा.चतुर गाढे यांनी तर आभार यासीन तडवी यांनी मानले. यशस्वीतेसाठी यासीन तडवी, सचिन पाटील, संतोष पाटील, सलीम तडवी, शिवराय लोलपे, विक्रम राठोड, सुलेमान तडवी, आदींनी परीश्रम घेतले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !