राज्यातील महाविद्यालये 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार
मुंबई : राज्यातील महाविद्यालये 1 फेब्रुवारीपासून पूर्ववत सुरू होणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावल्याने राज्यातील शाळांपाठोपाठ महाविद्यालये आणि विद्यापीठे पुन्हा सुरू होत असल्याने पालकवर्गातून समाधान व्यक्त होत आहे. कोरोनामुळे राज्यातील महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असलातरी आता प्रादुर्भाव कमी होत असल्याने पूर्ववत महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
दोन लस घेणार्यांनाच मिळणार प्रवेश
कोविडची परीस्थिती पाहून निर्णय घेण्याचा अधिकार विद्यापीठ आणि स्थानिक प्रशासनाला असणार असून ज्या विद्यार्थ्यांचे दोन डोस पुर्ण झालेले आहेत त्यांनाच महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत घेण्यात येणार्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात तर त्यानंतर परीक्षा ऑफलाईन घ्यायच्या किंवा ऑनलाईन याचा विचार स्थानिक पातळीवर घेण्याचा अधिकार आहे.

