मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई : सात कोटी रुपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त
मुंबई : बनावट नोटाप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेनं (mumbai crime branch) सात जणांना अटक केली असून सात कोटी किंमतीच्या दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. दहिसर येथे सापळा रचून गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. बुधवारी सात आरोपींना न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
मुंबई गुन्हे शाखा यूनिट 11 ला बनावट मुंबई गुन्हे शाखेचं एक पथक दहिसर (dahisir) येथे पोहचलं. गुन्हे शाखेने सापळा रचत आरोपी येत असलेल्या गाडीला थांबवलं अन् विचारपूस केली. तपासामध्ये या गाडीतून पाच कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. या सर्व नोटा दोन हजार रुपयांच्या होत्या. दोन हजार रुपयांच्या 25 हजार नोटा मुंबई गुन्हे शाखेनं (mumbai crime branch) जप्त केल्या.

